फुलांच नशीब

Started by अनुप पुरोहित, March 18, 2020, 03:27:56 PM

Previous topic - Next topic

अनुप पुरोहित

जगन्नियंता निर्मित फुलं सुंदर
इंद्रधनूच्या रंगांची ओढून चादर
काही औषधी, काही सुवासिक
सर्वांस मोहक आकर्षक

उमलत्या जागी काही कोमेजून जाती
काही गळून धरे ला सजवती
माळीले जातत कोणी केसांत
कोणी प्रभूच्या चरणात

रंग बनुनी कोणी आनंद देतात
कोणी अत्तर होऊनी सुगंध दरवळीतात
काही सजवटीस पात्र होऊनी शोभिले
तर कोणी प्रेतास शृंगारिले

–अनुप

Atul Kaviraje

Re: फुलांच नशीब

     अनुप सर, प्रत्येक जण जन्मताच आप - आपापले नशीब घेऊन येत असतो, व जगत असतो. फुले ही
काही वेगळेपण जपत नाही. आता या फुललेल्या फुलांनी नेमके कुठे जावे, कुणाची शोभा वाढवावी, हे त्या फुले तोडणाऱ्याच्या, फुले खरेदी करण्याऱ्यांच्या हाती असते.

     आपण आपल्या कवितेत नमूद केल्याप्रमाणे फुलांना कितीतरी ठिकाणी, कितीतरी प्रसंगी विराजमान व्हावे लागते, शोभा वाढवावी लागते. परंतु म्हणून ती काही दुजा - भाव दाखवीत नाहीत. आनंदाने ती हे कार्य करीत असतात. काहीही मिळण्याची अपेक्षा न बाळगता.

     फुलांनी सुंदर बहरलेली वाटिका
     औदार्याने फुले वाटत असते
     ती पाहात नाही तेव्हा
     फुलांचे निर्माल्य कुठे होते !

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक- रविवार -२३.०५.२०२१