अजूनही

Started by Manu Makule, March 18, 2020, 07:16:06 PM

Previous topic - Next topic

Manu Makule

अजूनही डोळे दाटलेले अन् गळ्यातुनि हुंदका;
गाळलेला तो थेंब होता उसना मागच्या क्षणातला.

कोणी वदले, कोणी हसले; ऐकावे आपुली शांतता;
कोणी चिडले, कोणी रडले तू ही तयाची वाट पाहा.

नुमजे मज लोभ आणिक द्वेष काही; मनमुराद सोहळा
आपुल्यात उसळते, मग आपुल्याशी परकेपणा;

काय आहोत? कोण आहोत? साऱ्याचे सूर कोड्यात,
जीव भांबावतो अन् भावविश्व सापळ्यात..

- म. म.