दुःखाने

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 20, 2020, 08:15:00 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.दुःखाने*

मुबलक पुरावे कशाला मागवले दुःखाने
क्षणिक सुखाला कशाला पाठवले दुःखाने

मी अधांतरी असा एक वाटसरू काव्याचा
आधार होते उरलेले कशाला तोडले दुःखाने

कोण कुणाला पुसतो लोका हो आजवर इथे
गाडलेले स्वप्नं थोडेसे कशाला खोदले दुःखाने

कालचाच विषय घे तू माणसा शिकण्यास
उगा अस घरात बसून कशाला ठेवले दुःखाने

जनजीवन विस्कळीत झालं हलगर्जीपणाने
स्वतःच्या काळजीने कशाला बांधले दुःखाने

जगणं शिकवून जाईल एक रोग माणसाला
गरीब माणसाचे अश्रू कशाला सांडले दुःखाने

जगलो काय अन मेलो काय समाजात आता
ती जळकी लोकं कशाला सांभाळले दुःखाने

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर