विचार करा ?

Started by AMRAPALI, March 21, 2020, 02:43:09 PM

Previous topic - Next topic

AMRAPALI

विचार करा ?

कधीतरी माझ्या शब्दांचा आदर करा...
मुलगी आहे म्हणून काय झालं माझ्या विचारांना पण मान द्या....

परक्या घरची नाही तर आपल्या घरची समजून,
कधीतरी आमचा विचार करा...

मुलगी आहेस आदर कर हे वाक्य ऐकून,
थकलो आता आम्ही...

लहान आहेस शांत बस बोलता येत,
लहानच आहोत तर लग्न कर कसं बोलता येत..

इतके वर्षे उलटली पण अजूनही आम्हाला विचार करूनच वागावं लागत,
ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही आम्ही कमकुवत आहोत...


-आम्रपाली