कविते

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 22, 2020, 08:14:29 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कविते*

कशाला उगाच आता शब्दांशी भांडू कविते
तू असतांना सोबती का दुःख मांडू कविते

वेड लागले तुझे तर का शहाणा होऊ मी
आसवांच्या पंगतीत कशाला सांडू कविते

असाच रोज कविता लिहितो मी तुला पाहून
शब्द सोबतीला घेऊन ओळ का कांडू कविते

कशाला पुढाकार घेऊ तुला घेऊन येण्याचा
काळजातले चटके कोणाला दाखवू कविते

असेच शब्द जोडून तयार होते कविता माझी
घावावरच्या खपलीचे गणित का सांगू कविते

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर