एकात्मता

Started by sachinikam, March 22, 2020, 02:30:53 PM

Previous topic - Next topic

sachinikam

एकात्मता (कवी: सचिन निकम, कवितासंग्रह: मुकुटपीस)

एकाग्रता इतकी होउदे की
जीव शिवाशी एकरूप होईल
एक सूर्य असा प्रकाशूदे की
अंधाराचाही एकटेपणा नष्ट होईल
एक दिवस एकमताने उजाडूदे की
साऱ्या विश्वात एकता नांदेल
एकदा एकत्र सारे एका सुरात गाऊदे की
एकसंघ होऊनि सारे एकात्मता पाहतील.