लावणी - होळी

Started by शिवाजी सांगळे, March 22, 2020, 03:37:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

होळी (लावणी)

अवचित राया तुम्ही हो आला
सण होळीचा गोड की झाला

मिळो लाडीक तुमचाच संग
होऊन जावू या दोघ बी दंग
उडवून द्या पिचकारीतला रंग

ऐटीत शोभते तुमची स्वारी
नशा चढेल अंगभर न्यारी 
खुशाल करा तुम्ही जोराजोरी
येईल मजा आपल्या खेळाला
अवचित राया...

रंगेल सण वर्षातला लाख 
सोडून रुसवा वागूया नेक
ऐकावं म्हणणं माझं हे एक

कुरडया,भजी बरीच तळली
मऊ पुरणाची पोळी केली 
तिखट आमटी कटाची झाली
चाखून चढवा रंग या पंक्तीला
अवचित राया...

©शिवाजी सांगळे 🦋
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९