तुझी मिठी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 25, 2020, 12:23:39 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझी मिठी*

तू बोलतेस न अस वाटतं
सारं आभाळ गोळा झालंय
तू अन मी चिंब भिजणार म्हणून
ते ही आज भरून आलंय

तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्या
ओठांचा नवा नवा रंग
कसं पहावं एकटक म्हणून
मी भिजण्यात व्हायचो दंग

तू लाजलिस अशी की
कविता लिहायला सुरुवात होते
मिठी घट्ट व्हावी म्हणून
तुझी माझी सावली सोबत देते

वारा उनाड वाहू वाहतो
मन सैरावैरा पळत जातं
श्वासांचा ताळमेळ हुकतो
तेव्हाच ओठांच भांडण सुरू होतं

मी असाच स्तब्ध उभा होतो
तू हलकेच मिठी सैल करते
काळजात विजांचा कडकडाट होतो
पुन्हा प्रेमाचे नवे आभाळ भरते

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील)..
मो.९६३७०४०९००.अहमदनगर