संकटाचा गुढीपाडवा

Started by mahendra karande, March 25, 2020, 02:34:08 PM

Previous topic - Next topic

mahendra karande

संकटाचा गुढीपाडवा

नवीन वर्षाची नवीन,
सुरवात करूया |
सर्वानी मिळून कोरोना,
व्हायरसला हरवूया ||

सण उत्साहाचा नवं वर्षाचा,
नव्या आनंदाचा |
दारी बांधुनी तोरण करूया निर्धार,
घराबाहेर न पडण्याचा ||

करूया साजरा सण गुढीपाडवा,
आपली परंपरा पाळूया |
सर्वानी नियम पाळून
कोरोना व्हारसला टाळूया ||

गुढीपाडवा हा सण
मराठी अस्मितेचा,आपल्या परिवाराचा |
हाच तो क्षण आपण
आपला देश वाचवण्याचा ||

सिद्धेश्वर अंकुश कोयले (सोलापूर)