कोरोना

Started by Rakeshshinde12, March 26, 2020, 07:40:20 PM

Previous topic - Next topic

Rakeshshinde12

कणा नाही.. कोरोना (कुसुमग्रज यांची माफी मागून)

ओळखलस का माणसा मला
परदेशातून आलो आहे मी
सर्दी पडसे खोकला
आणि पसरतो स्पर्शातूनी

क्षणभर बसून थोडेसे हसून
असा जाणार नाही मी
वेळीच काळजी घेवूनी
घरी बसून राहणे हीच खरी चाचणी

परदेशातून पाहुणे आले
गेले देशात राहुनी
पैसा हाती घेवूनी गेले गावोगावी फिरुनी

काम थांबले देश थांबला चूल ही विझली
होते नव्हते सगळे बंद पडले
प्रसाद म्हणुनी स्पर्शा मधुनी
कारोना देवूनी गेले

डॉक्टर पोलीस घेवूनी संगे
आता सर्वजण लढतो आहे
संचारबंदी करूनही
बाहेर आम्ही फिरतो आहे

तोंडाकडे हात जाताच
काळजी करत बसला
पैसा घ्या हवा तेवढा
पण मास्क द्या चांगला

मोडून पडला संसार तरी
गेला नाही कोरोना
पाठीवरती हात न ठेवता
नुसते घरी बस म्हणा
________________
कवी राकेश शिंदे