तिरस्कार करू नकोस

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 30, 2020, 08:32:31 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तिरस्कार करू नकोस*

कधी वाटलंच तुला तर
काढून बघ काळीज माझं
विश्वास बसणार नाही
बघ कसं नाव घेत तुझं

तू असं ही कधी तुझं
कुठं म्हणतेस का मला
अगं घेऊन बघ मिठीत
माझी जाणीव भासेल तुला

तिरस्कार करू नकोस
बघ नकळत स्पर्श करून
मी असा ही संपलेलो आहे
एकदा बघून घेशील डोळे भरून

जगतो कधी कधी आठवणीत
म्हणून आठवणी संपणार नाही
माझं होण्यासाठी शेवटचं तरी
एकदा तू मागून बघ तरी काही

आसवांच गणित सोडता सोडता
प्रेमतल्या गुणकाराचा गुंता वाढला
श्वासाची बेरीज राहिली बाजूला
अन मरणाचा भागाकार झाला

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर