उगाच का दोष दिलास

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 31, 2020, 11:19:32 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.उगाच का दोष दिलासा*

तुझ्या जवळचे प्रेम
जरासे मागितले होते
उगाच का दोष दिलास
सारे तुला सांगितले होते

पहारा देतो सूर्य आता
रोज माझ्या दुःखाला
कधी कधी वारा येतो
घेऊन नकळत सुखाला

सुगंधित होते धरणी
साड्यांनी आसवांच्या
वाट देते सबूत सारे
कवितेला विरहाच्या

अत्तराला भाव नाही
पांगला दुःखाचा सुगंध
गरीब होती ती ज्योत
जिचा प्रकाश होता मंद

मंद प्रकाशात कविता
तुझ्या नावाची सजवतो
प्रश्न करतात श्वास सारे
आत्मा असा का झिजवतो

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर