मी असाच आहे

Started by Nitinsital, April 02, 2020, 12:31:36 PM

Previous topic - Next topic

Nitinsital

    मी असाच आहे

माझं  जीवनाचं जगण्याचं एक जरा वेगळंच पुस्तक आहे
माझं वागणं आणि जगणं थोडस विचित्र आहे
करत असतो मी सर्वांचांच विचार
होऊनि हतबल मी असतो मी लाचार
आहो मी असच आहे......

मी असाच आहे हो मी तसाच आहे का म्हणतात लोक
मी सुखी आनंदी पाहून पडतात का यांना भोक
कधी कधी वाटतं करून टाकावा यांचा शिरच्छेद
पण त्यांच्या वरच्या रगाचा  असतो 4-5 ओळींन इतकाच परिच्छेद
आहो मी असाच आहे ........

मला आवडत नाही कुणाला कणमात्र दुःखवायला
काय माहीत कधी येतोय देव आमच्या नशिबात सुख वाह्याला
आपुलकी ने घेत असतो मी पावलो पावलो सर्वांचीच  काळजी
स्वतःला जगवण्यासाठी बनवली आहे मी स्वतःची रितच वेगळी
आहो असाच आहे मी .........


माझ्या मनाला मी सारख  असतो मी  समजावत
वाद घातल्याने नाती होतात रे वेड्या कमकुवत
त्यानादात  होईल तुमच्या मध्ये  होईल   निर्माण  पोकळी
जर ती वेक्ती सोडून गेली तर कोण भरणार  ती जागा मोकळी
आहो मी असाच आहे.........

मी नाही कुणालाही करणार माझ्यापासून मी दूर
नेहमीच वाटत असतो लोकांना मी क्रूर
पण स्वतःलाच समजावत असतो तू आहेसच शूर
लोकांना फक्त जोडत जा जाऊन देऊ नकोस कोणाला ही स्वतःपासून तू दूर
आहो मी असाच आहे.......

आहो मी असाच आहे आणि येथून पुढे ही राहणारच असा
प्रत्येक सुखदुःखातून पाऊलवाट काढण्याचा घेतलाय रे मी वसा
या सर्वातूनच उमठवनार मी माझा वेगळाच ठसा
म्हणतील सर्व लोक पहिला होता साधा नित्या आणि आता झालाय असा कसा .
मी असाच आहे .........

            कवी :- नितीन सिताळ