एकटा एकटा असतांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 04, 2020, 09:32:33 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.एकटा एकटा असतांना*

एकटा एकटा असतांना
मी तुला कवेत घेतले
रस्ते वेगळे वेगळे सारे
तिथे प्रेमाचे काटेच भेटले

कुणाला जवळ घेऊ मी
आपले म्हणून आता रे
सूर्य वेगळा वेगळा भासला
तरी तो चंद्र सोबत होता रे

क्षितिज भेटले होते मला
तू एकटी सोबत असतांना
मी कुठे पाहिले होते रे
लेखणीची शाई तू होतांना

आता कुठे कुठे शोधू
श्वास माझे कोंडलेले
अंधार भेटत नाही आता
जिथे सांजफुलें अंथरलेले

वाट पाहिली होती काल
सुगंधी फुलांच्या अत्तरांची
प्रश्न सारे भेडसावत होते
सरणावर भेटणाऱ्या उत्तरांची

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर