दु:ख

Started by shrutibhande, April 05, 2020, 06:05:57 PM

Previous topic - Next topic

shrutibhande

दु:ख आयुष्यात येतात,
ती एक मोठी फौज घेउनच.
ती कधीही एकटी येत नाहित,
कधी कधी इशारा देऊन येतात,
तर कधी कधी बेसावध अस्ताना,
चोर पावलांनी झडप घालतात.

ती येतात तेव्हा अनेक नाती,
कायमची दुराव्तत तर काही,
नव्याने निर्मान होतात.

नवर्याला बायको पोरकी होते,
तर बायकोला नवरा पोरका होतो.
मुलांना आई पोरकी होते,
तर आई मुलशिवाय वांज राहते.

ती अनेक प्रश्ण घेउन येतात.
भुतकाळ विसरयला लावतात,
भविष्याचा विचार करयला भाग पाडतात.

अनेक आठवणी घेउन येतात,
काही रोचक काही जाचक,
काही रेशमी काही काटेरी,
काही विसरली गेलिली,
काही शेवटपर्यंत न विसरतायेनारी.

दु:खाला आधार लागतो,
आपुलखीचे शब्द लागतात,
आश्वासक पाठिंबा लागतो.
प्रेमाचा ओलावा लागतो.

तसं सुखाला कुठल्याही आधाराची गरज नस्ते,
कारन ते आनंदाच्या परमोच्च,
शिखरावर डोलत असते.

हे दु:ख कधी निराशिच्या,
गर्तेत सापडतं कधी हताश होते,
दिवसा उजेडी हसत बसते,
आणि रत्तीचया घोर अंधारात,
मूक आक्रंदन करत बसते.

~ श्रुती भांडे