कोरोणा तुझे आभार मानू की दुःख व्यक्त करू

Started by Pranju Pawar, April 06, 2020, 05:04:56 PM

Previous topic - Next topic

Pranju Pawar

कोरोना तुझे आभार मानू की कारोना तुझे दुःख व्यक्त करू...
आज 20 वर्षात असा अद्भुत दृश्य बघितला नाही,
कोरोना तुझे आभार मानू की कोरोना तुझे दुःख व्यक्त करू...

आज खुल्या आभाळात पक्षी मनसोक्त पने उडत आहे याचं आनंद व्यक्त करू,
की माझा बाप आज स्वतःचा विचार न करता या लढाईत शामिल आहे याचं दुःख व्यक्त करू,
कोरोना तुझे आभार मानू की कोरोना तुझे दुःख व्यक्त करू...

आजवर हे युग कधी थामल नाही, तू एकदम त्याला स्थगित केलं याचं आभार मानू,
की गरिबांचे होत असलेले दृश्य पाहून दुःख व्यक्त करू,
कोरोना तुझे आभार मानू की कोरोना तुझे दुःख व्यक्त करू...

आज पूर्णपणे हे प्रदूषण नष्ट होत असताना दिसत आहे याचं आभार मानू,
की लोकांना खाण्या पिण्याच्या अडचणी ना सामोरे जाण्याचं काम पडत आहे याचं दुःख व्यक्त करू,
कोरोना तुझे आभार मानू की कोरोना तुझे दुःख व्यक्त करू...

काल पर्यंत प्राण्यांचा बळी जात होता, आज ते पूर्णतः बंद आहे याचं आभार मानू,
की मानव जात मोठ्या संख्येने बळी जात आहे याचं दुःख व्यक्त करू,
कोरोना तुझे आभार मानू की कोरोना तुझे दुःख व्यक्त करू...

- प्रांजली माणिक पवार
6 April 2020