झुंज

Started by sachinikam, April 06, 2020, 07:57:58 PM

Previous topic - Next topic

sachinikam

झुंज (कवी: सचिन निकम, मुकुटपीस)

रात्र सारी तेवलो
वात दिव्याची जागून.
उजळले सारे कोपरे
सूर्यासारखे वागून.
आला वारा फुलवून पिसारा
उठला अंगावर शहारा.
घेतले काळीज ओंजळीत
निःश्वास काजळी गळीत.
नाही काळजी नाही खंत
झुंजेन अखेरच्या श्वासापर्यंत.