सद्यस्थिती

Started by Vishal ingale, April 06, 2020, 10:50:16 PM

Previous topic - Next topic

Vishal ingale

कोरोना नाव छोटेसे
आकार खूपच कमी
जग बंद पाडलंय
मरणाची नक्कीच हमी

डॉक्टर मरणाशी खेळताहेत
भीती समोर हरली
काही नियम उल्लगंन करताहेत
पोलिसांसमोर त्याची जिरली

घरात राहणे योग्य
का पत्करायचा धोका
काही. बिगडणार नाही
जरी बंद शहराचा नाका

तरीही घडले कार्यक्रम
हजारो आले एकत्र
वेळ देशाच्या रक्षणाची
तुमच्यापेक्षा बरं कुत्र

झाली लागण तुम्हाला
रक्षा करतोय आम्ही
तिथेही घाण केली
किती कृतघ्न तुम्ही.


              कवी:-विशाल इंगळे