हेचि मागणे

Started by sachinikam, April 07, 2020, 03:57:37 PM

Previous topic - Next topic

sachinikam

हेचि मागणे    (कवी: सचिन निकम, मुरादमन)

तू दिसावा म्हणुनि देवा
लावला दिवा देवाऱ्यात.
घडावी नित्य तुझीच सेवा
नामाचा ठेवा अंतरात.
चालाया सन्मार्ग दाखव दिशा
सत्कार्याचा झेंडा हातात.
मिळावा सत्संगाचा विसावा
हेचि मागणे हाचि धावा.