प्रेमकविता

Started by Krutika kharbad, April 08, 2020, 01:03:44 PM

Previous topic - Next topic

Krutika kharbad

कसे करायचे नाही सुचले
पण मनामध्ये होते त्याला जपले
त्याच्यात काय पाहावे हे नाही कळले
प्रत्येक गोष्टीत त्याच्या मन गुंतून राहिले
असेच मी पहिले प्रेम केले...💖

चंद्र ताऱ्यांमध्ये रमता स्वप्न मी सजवले
हवेत बागडते मन माझे थाऱ्यावर न राहिले
त्याची भेट घेण्या मन होते उतावीळ जाहले
आरश्यात सुद्धा मी त्याच्याच नजरेने पाहिले
असेच मी पहिले प्रेम केले...💖

तोच मला माझा हिरो वाटू लागले
माझ्या भावविश्वात मग दोनच जीव उरले
राजा-राणी बनून मी स्वप्न रंगवत गेले
जीवाला जीव देण्याचे सूर मनात वाजले
असेच मी पहिले प्रेम केले...💖

रितीप्रमाणे पहिले प्रेम अधुरेच राहिले
जीवनाच्या चौकटीत मी आता एकटीच जाहले
आठवणींत त्याच्या जरी कविता करायला शिकले
पण प्रेम नावाच्या परीक्षेत नापास मी जाहले
असेच मी पहिले प्रेम केले...💖

©कृतिका
©कृतिका