नको देऊस अंतर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 08, 2020, 11:08:56 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.नको देऊस अंतर*

नको देऊस अंतर आता
प्रेमाच्या कविता संपतील
लेखणी विसरभोळी आहे
तुझे तिचे भांडण जुंपतील

आता किती दिवस झाले
तुला स्वप्नांत पाहतो आहे
पण खरंच सांगू सजने गं
तुझ्यासाठीच श्वास वाहतो आहे

हवी हवी असतेस तू मला
पाऊल खुणा मोजतांना
चांदण्या लपल्या की सारा
घोळ होतो तुला कवेत घेतांना

गाली स्मित हास्य तुझ्या गं
काळजावर नाव कोरू लागतं
सांज जवळ येते नेहमी सारखी
अन अंधार तुझं रूप चोरू लागतं

तुला खूप मुदत दिली आहे
निवांत कळव काय घाई नाही
तू उत्तर देशील या आशेवर
रंग देऊन ठेवील साऱ्या दिशा दाही

अजून किती छळणार आहेस
तू मला काहीच नाही सांगितलं
रुपाच गुपित अन ओठांच गणित
आता हेंच सारं मी देवाला मागितलं

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर