आता विझावं तरी कसं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 08, 2020, 11:10:00 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आता विझावं तरी कसं*

आता विझावं तरी कसं
काळजातल्या दिव्यांनी
कोण कुठला मी आता
साथ दिली काजव्यांनी

हात माझे भाजले होते
राख प्रेमाची चाळतांना
आसवे प्रश्न विचारत होते
आठवांचे स्वप्नं माळतांना

किनारे धिक्कारु लागले
तुझ्यामुळे माझ्या नात्यांना
का सांडू लागले सारे पैलू
कारण सापडले नाही मोत्यांना

किती विसावू धरणीवर
मरण ही अंतर मागत होते
विश्वास उडाला डोळ्यांचा
सरण ही नकळत पांगत होते

तुझ्यामुळे घडत होते सारे
विस्तव आता विझत होता
कालचक्र मागत होते पुरावे
म्हणून आत्मा झिजत होता

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर