पाऊल खुणा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 10, 2020, 09:51:26 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पाऊल खुणा*

अंधुक होऊ लागल्या होत्या
तू येण्याच्या पाऊल खुणा
वाट चुकत असतांना सुरू
झाले विरहाचे गाणे पुन्हा

किती दिवस सांभाळून ठेऊ
आठवणी आता झिजू लागल्या
कोऱ्या पानांवर सुरू होणाऱ्या
नकळत आसवांनी भिजू लागल्या

सुख चार दिवस असतांना
काळजातलं विवर पूर्ण भरायचं
तू असा कसा खेळ केलास
अन काळीज पुन्हा हरायचं

बघा गडयांनो आयुष्य सारं
आसवांचा थेंब शोधण्या गेलं
पापण्यांच गुपित आज या
साऱ्या संसारास माहीत झालं

वावटळ आली दुष्मणाची
उरलेलं आयुष्य उडून गेलं
सुखाच्या टोपल्यात भाकरीचं
झाड ही कुजून कुजून मेलं

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर