खूप काही वाटायचं..

Started by Falguni Dhumale, April 10, 2020, 10:58:42 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

कसे सांगु तुला ? खूप काही वाटायचं..
विचारांचा कल्लोळ होऊन, आभाळ मनात दाटायचं...
तु माझा असावां, म्हणून मनापासून वाटायचं..
फक्त तु सोबत असतांना, बेधुंद वागायचं..
आयुष्याच्या प्रत्येक वाटेत, तुझं होऊन जगायचं..

त्याच त्या, विषयावर बोलत, तासन् तास बसायचं..
भरलेच डोळे आसवांचे, जवळ येऊन पुसायचं..
बोलून-बोलून विचारातील, 'का?' ला संपवून टाकायचं..
अल्लड प्रश्न विचारत तुला, कोड्यात नेऊन सोडायचं..
तुझ्या-माझ्यातील सुंदर स्वप्न, डोळे मिटवून बघायचं..
तु असण्याचा आनंद, मनात साठवत, स्वत:शीच हसायचं..
हसत-हसत पूर्ण वेळ, सर्व काही विसरुन जायचं..
तु इथेच, नेहमी, असाच असावा, हेच मागणं मागायचं..
तुझ्या नसण्याच्या भितीने, कायम व्याकुळ होऊन जायचं..
घडलेला क्षण परत जगता यावा म्हणून, मनोमन झुरायचं..
आठवणी कधीच संपू नयेत म्हणून, जग रंगवून टाकायचं..
वेळेभोवती रिंगण घालुन, थोडा धीर धरायला सांगायचं..
मनातील सर्व इच्छांना तुझ्यावर सुरु करुन, तुझ्यावरच संपवुन टाकायचं..
.
.
.
पण अल्लड, कशी वेडी मी...?
असे वाटणे योग्य नाही, हे सुद्धा, नाही कळायचं...


- फाल्गुनी