अजून.. तुझ्या नसण्याची जाणिव मला होते आहे...

Started by Falguni Dhumale, April 10, 2020, 11:06:34 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

माझ्या डोळ्यातील 'स्वप्न' विरुन गेले आहे..
माझ्या गालावरील 'स्मित' पुसत चालले आहे..
माझ्या हसण्याचा आवाज मी, केव्हाचाच विसरली आहे..
माझ्या बोलण्यातील 'गोडवा' कधीचाच संपला आहे..
माझ्या वर्तमानातील 'तु' मला कधीचाच सोडून गेला आहेस..
माझ्या विचारातील 'तुला' पुर्णविराम मिळाला आहे..

आणि....
तुझ्या नसण्याची जाणिव मला होते आहे...