तुझं येणं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 10, 2020, 05:42:42 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझं येणं*

तुझं उदास उदास राहणं
उधार राहिलं माझ्याकडं
रात्र आली उशाला माझ्या
अन तू पाहिलं माझ्याकडं

या कुशी वरून त्या कुशीवर
मी आपला लोळत बसलो
तुला पुन्हा पहायचं राहिलं
सोनं सोडून दगड घोळत बसलो

आता कुठं तू स्वप्नात आलीस
निबंध लिहायला सुरुवात झाली
एक दोन ओळी आठवल्या
अन पुन्हा पानगळ सुरू झाली

अस कसं असतं रे तुझं येणं
दोन घडीचा डाव रचून जातं
बघ नेहमीच असं होतं असतं
रेतीवरचा महाल खचून नेतं

आता पुन्हा कधी येशील तू
असं एकदा तरी सांगून जा
अंधुक त्या काळ्या मण्यांची
नकळत राणी तू होऊन जा

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर