वहीच्या शेवटच्या पानावर

Started by Dnyaneshwar Musale, April 12, 2020, 06:59:11 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

वहीच्या पानावर लिहलेले
तीच नाव, आज ही आहे तसच,
अगदी हातावर कोरलेलं मेहंदी सारखं,
विसरावे म्हणतो पण
विसरत नाही कसचं.

तु केसात माळायची तसच
एक फुलंही कोरलं आहे
वहीच्या शेवटच्या पानावर,
कितीही खोडलं तरी
आता लिहिलं गेलं
मनावर.

तु हसायची तशीच
माझी वहीची पाने ही हसायची,
माझ्यासारखीच वहीची पानेही
तुझ्यातच हरवलेली असायची.


शाळा संपली वही
भरली,
अनं तु पुन्हा दिसलीच नाही,
पण
त्यानंतर अनेकदा वही उचकली
पण वही कधी तेव्हासारखी हसलीच नाही.


पाणी डोळ्यात येतं
वहीच्या पानावर पडतं,
अलगद
पानं पुन्हा पुसायची,
पण समजत नाही
ही बाईडिंग केलेली
वही का बरं आता रुसायची,
ठीक आहे त्या वहीला
कुठं काय समजतंय,
त्यात तर फक्त आठवणी
लिहून ठेवल्यात,
पण माझं काय
मी तर साऱ्या आठवणी
काळजात कोरून ठेवल्यात,

वही तर एकदिवस
रद्दी म्हणुन जमा होईल,
मग तर ती रद्दीही माझ्यावर हसु लागेल,
ती ही माझ्याशी परकं
म्हणुन वागु लागेल.
अगदी तुझ्यासारखंच.