प्रेम कविता

Started by Somnath talekar, April 13, 2020, 10:28:32 AM

Previous topic - Next topic

Somnath talekar

तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं...

एवढ्या मोठ्या विश्वात
माझ्या डोळ्यांनी तुला पहावं
तुला पाहिल्या पासून
माझ्या मनानं बेचैन व्हावं
होशील का माझी सोबती तू
तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं

मला वाटतंच होतं की
माझं प्रेम निराळचं असावं
कोणी कितीही दूर असलं तरी त्यांनी मनात घर करून रहावं
होशील का माझी सोबती तू
तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं

दररोज सकाळ संध्याकाळ
तू मला अन् मी तुला आठवावं
कुठेतरी एकांतात निवांत
रोज आपण भेटावं
होशील का माझी सोबती तू
तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं


सुखी ठेवील तुला खूप मी
मनात तुझ्या शंकेच कारण नसावं
देईल तुला मी जीवनाचा प्रत्येक आनंद
जे तुझ्या स्वप्नांत असावं
होशील का माझी सोबती तू
तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं

आयुष्य जगत असताना प्रत्येक
क्षणाला सोबत तू असावं
आता या क्षणाला फक्त एवढंच वाटतं
की तुझ्याविना आयुष्य माझं अधुर ना रहावं

शब्दांचा जादूगर:-सोमनाथ तळेकर
मो.नं 8108885930