काळी माय

Started by shrutibhande, April 13, 2020, 06:45:47 PM

Previous topic - Next topic

shrutibhande

काळी माय

आज माजो चाकरमानी,
काळ्या आवशीक इसारलो,
म्हणांन चाकरी करित
देश-विदेशत पसारलो.

माजी आयसं काळी होती,
पण नव्हती कपटी, कारण
तिच्याच जीवार घरची धनीण
थापतट होती भाकरी.

भावा-भावात वितुश्ट शिरला,
नि सगळ्यांचा टाळक्या फिरला,
आवशिचो केल्यानी सौदो
तुकडे तुकडे वाटुन घेतल्यानी
गाठीकनाय उरलो पैसो.

आता आवशिची आठवण येता,
पण सांगतलस कोणाक दु:ख ?
आप्ल्याच पायावर मारलयं कुरहाड
म्हणांन रवाचा लागता गप्प.

~ श्रुती भांडे