भिमराव राष्ट्रनिर्माता

Started by Rushi.VilasRao, April 14, 2020, 11:55:46 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

कोणाचा जन्म कोणाला काय देवून गेला...
भिमरावाचा जन्म माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देवून गेला...
शापित होत्या पिढ्यानपिढ्या....
गुलामगिरीच्या बेड्या तोडून गेला...
नव कोटींच्या अंधारलेल्या दुनियेत प्रखर सूर्य होवून गेला....
म्हणू दिला नाही साधा श्लोक मनुवाद्यांनी...
ना वर्गात कधी बसू दिलं...
काबाडकष्ट करून शिकला भिमराव आणि १२ उच्चशिक्षित पदव्या मिळवून गेला....
Writer:-मी स्वतः....
शिकत राहिला शेवटच्या श्वासापर्यंत आणि...
जगाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर स्वतःच नाव नोंदवून गेला...
ज्ञानाच्या जोरावर भारताचा घटनाकार अन् कायदे पंडित होवून गेला...
मागत राहिलात ३३ कोटी देवी-देवतांना एक छदाम त्यांनी दिलं नाही....
तुमच्या १,७,६० पिढ्यांना पुरून उरेल एवढं आत्मसन्मान शिक्षण आणि समानतेच्या धनाच  गोदाम भरून देवून गेला....
ज्यांच्या सावली मुळे सुद्धा पाप लागत होत त्यांना समानतेचा हक्क देवून गेला..
आदर्श जीवनाचं देणं देवून त्यांच्या नशिबी बुद्ध धम्माचा साज चढवून गेला...
गर्वाने दिला त्याला नव कोटींनी बापाचा दर्जा कारण एक म्हाराच पोर ३३कोटींना पुरून उरून गेला...
जाती भेदाने भरलेल्या विषमतेच्या दुनियेत...
मानवाला मानवाचा हक्क देवून समानतेचा वटवृक्ष लावून गेला....
कोणाचा जन्म कोणाला काय देवून गेला...
पण भिमरावाचा जन्म माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देवून गेला...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan®©