बळीराजा

Started by Nilesh Narwade, April 16, 2020, 02:12:50 AM

Previous topic - Next topic

Nilesh Narwade

बळीराजा

किती रे उन्हाळा
कर थोडीशी कृपा कृपाळा

भाजती पाय जसे सर्वत्र निखारे
आणी चामडी सोलतात बघ उफाणलेले वारे

तहानेने होते उरी कसुसे
कोरडी झाली विहीर सुऱ्या गत बोचे

पेटली ही शेत गळाली सगळी पाने
नागडी केली बघ झाडे उन्हाने

उंच गगनी फिरे घार आकाशी
भुकेने मेलीत जनावरे उपाशी

अशी ही व्यथा माझ्या बळीराजाची
झोपतोय घेऊन चर्हाट उशाशी

निलेश नरवाडे
#follow on Instagram
@impel_life