लढा

Started by sachinikam, April 16, 2020, 08:23:49 PM

Previous topic - Next topic

sachinikam

लढा      (कवी: सचिन निकम, मुकुटपीस)

इथे कायम चाललाय लढा
कुणाचा तरी कुणाशी
काहीतरी मिळवण्यासाठी
काहीतरी जुळवण्यासाठी
सजीवाचा निर्जीवाशी
मानवाचा निसर्गाशी
कर्माचा नशिबाशी
कर्तृत्वाचा नियतीशी
मनाचा बुद्धीशी
सत्याचा अन्यायाशी
सुखाचा शाश्वततेशी
प्रजेचा सत्तेशी
संपत्तीचा आपत्तीशी
कमाईचा खर्चाशी
रंकांचा रावाशी
शहरांचा गावाशी
क्रांतीचा जुलुमाशी
परिवर्तनाचा पुरातानाशी
नाविन्याचा रटाळाशी
रक्ताचा रक्ताशी
पिढीचा पिढीशी
जीवनाचा जीवनाशी
जिंकण्याचा मरण्याशी
काहीतरी करण्यासाठी
जीवनध्येय गाठण्यासाठी
आयुष्यभर मांडलाय लढा
आयुष्य सफल बनविण्यासाठी.

UNMESH TAYADE

कवी सचिन निकम यांची माफी मागून

इथे नेहमीच चालतोय...लढा
कष्टाचा नाशिबाशी
निर्जीवाचा सजीवाशी..
खऱ्याचा खोट्याशी
तर लहानाचा मोठ्याशी
जगण्याचा मरणाशी
वृद्धाचा सरणाशी..
कलेचा चोरिशी..
फाशीचा दोरिशी
पोटाचा भुकेशी
घडणाऱ्या चुकेशी..
ध्येय जरी वेगळे...तरी साम्य आहे लढा..
कुणाचातरी कुणाभोवती... सततचा वेढा...

मूळ कवी: सचिन निकम
विडंबन: उन्मेष तायडे

UNMESH TAYADE

खूप सुंदर कविता सर जी...अगदी वास्तव

- उन्मेष तायडे, पुणे