आठवांचे पान

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 19, 2020, 09:15:52 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आठवांचे वेगळे पान*

वाट पाहून थकले डोळे
काजव्यांची साथ घेऊन
आता वेळ निघून जाणार
आठवांचे वेगळे पान देऊन

अस्तित्वाला काडी लावून
भग्न आयुष्याशी वाट जोडून
सांग काय साध्य केलंस तू
सांगड शब्दांशी ही खोडून

सगे सोयरे गोळा होऊन
आता सांत्वन चांगले झाले
अनोळखी रात्र आसवांची
घेऊन द्वेष आडकाठी आले

जाब कोणाला विचारू आता
जीव मृत्युच्या वाटेवर नेला
रात किडे सोबतीला घेऊन
अंधारात तू असा घात केला

पाठी वार झाल्याने रक्त आटले
घाव गहिरा झाला काळीज फाटले
चांगली पर्वणी चालून आली
अन मी थेट जाऊन यमास गाठले

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर