आली तशी उपाशी

Started by pranaldongare, April 19, 2020, 07:30:23 PM

Previous topic - Next topic

pranaldongare

आली तशी उपाशी, सोडून रात गेली.
पोटात आग माझ्या, पेरून रात गेली.

ओल्या कुणा ऋतूच्या, जखमा मयूरपंखी.
ओठांवरी फुलांच्या, ठेवून रात गेली.

झोपेत गाढ जेव्हा, गाफील राहिलो मी.
हळुवार बंध सारे, तोडून रात गेली.

मैफिल ओस झाली, सारे निघून गेले.
डोळ्यात एक तेव्हा, जागून रात गेली.

अवचित लाभलेल्या, त्या मल्मली क्षणाला.
होताच स्पर्श माझा , लाजून रात गेली.