येशील ना सांग ना गं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 19, 2020, 11:51:08 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.येशील ना सांग ना गं*

आता जरासं बरं वाटतंय
लिहून लिहून थकलेल्या
अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या
तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या
काळजातल्या दोन शब्दांची कविता
अरे आज तुझ्या समोर सादर करतोय
तू ऐकशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

ऐकशील ना सांग ना गं....
ऐकशील ना सांग ना गं ...

तुला न विचारताच
मी तुला विसरून गेलो
तू भेटली नाहीस म्हणून पुरता हरलो
असं कसं तू समजून बसलीस
अन मला न विचारताच तू रुसलीस
मी तुझाच आहे अन तुझाच राहिलं
आत्मा शांत झाला तरी शेवटचं तुला पाहिलं
अरे तुझ्यासाठी एक एक क्षण मी झुरतोय
तू येशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

येशील ना सांग ना गं
येशील ना सांग ना गं .....

इतके दिवस एकटा एकटा जगलो
साऱ्या गावात वेडा ठरलो
कुणासाठी सांग ना कुणासाठी
माझ्याकडे डुंकून ही न पाहणार गावं
तुझ्यामुळं यांनी खोडल होतं माझं नावं
सुख सोडून आज सगळ आहे गं माझ्याकडं
म्हणून गावातला आता हुकमी एक्का ठरतोय
तू साथ देशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

देशील ना सांग ना गं...
देशील ना सांग ना गं ....

अजून किती दिवस थांबावं लागणार
तू अजून किती दुसोट्या सारख वागणार
याचं उत्तर शोधन खूप कठीण झालं आहे
भर उन्हात ही विरहाच आभाळ आलं आहे
आपल्या नात्यात जातीच अंधुक भुयार आहे
म्हणून मरण आता लवकर गाठणार आहे
जरा लवकर ये तू मी मरणाची तयारी करतोय
तू शेवट करशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

करशील ना सांग ना गं...
करशील ना सांग ना गं ...

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर