सटवी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 21, 2020, 10:29:02 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सटवी*

देवा का विकला पाऊस
आले चटके देण्यास ऊन
पाऊल खुणा मोजतांना
केला भावनांचा सटवीने खून

पापण्या खालच्या दुःखाला
अजून किती लपवणार मी
काळजातील वेड्या फुला
तूला अजून किती थांबवणार मी

राख मस्तकाला लावली
आज त्या वेड्या सटवीनं
पांघरण्या सुख अनोळखी
जशी घालमेल केलं टिटवीनं

सटवीनं काळीज फोखरून
दिला डोरल्याचा रं शब्द
वाहून गेलं अश्रूंच पांढर फूल
पाहून मावळतीचा सूर्य स्तब्ध

ओसाड झाले आता माळरान
घेऊन साऱ्या दुःखाच्या पंगती
आला सोसाट्याचा गार वारा
झाल्या उध्वस्त उरलेल्या संगती

आता मरण देशील का रे देवा
विरहाचे चटके सहन होणार नाही
सरण विकत घ्यावं लागलं देवा
सटवीनं असे डाव खेळले काही

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर