तिचं माझं प्रेम हे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 23, 2020, 01:50:57 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक .तिचं माझं प्रेम हे*

खूप दिवसांपासून
तिच्या मागावर असायचो
तिला पटवायचं म्हणून
तिच्या विरुद्ध वागायचो

नियतीचा खेळ किती
ती मी एक वर्गात आलो
नजर तिच्यावर असतांना
वर्गातून मी हद्द पार झालो

तसा टुकार होतो साऱ्यात
कॉलेज ही कंटाळलं होतं
मी का वागलो तसा म्हणून
आज डोळ्यात पाणी येतं

तिच्या साऱ्या मैत्रिणींनी
राख्या बांधल्या होत्या
पाच सहा जणी होत्या
मनाने खूप चांगल्या होत्या

एक दिवस तिनं उपवासाचं
माझ्यासाठी आणलं खायला
विचारलं मी कोण नाही तुझा
तुला काय झालं काळजी करायला

चुकीचे नाद सोडून दे सारे
ती मला म्हणाली होती
कशाला असा वागतोस
तुझी हिचं काळजी वाटती

कशाला काळजी करतेस माझी
तू टुकार म्हणून धिक्कारलं
तू आवडतोस म्हणून आज
तुझ्यावरचं प्रेम मी स्वीकारलं

तिचं प्रेम सर्वांसमोर स्वीकारून
मी तिला होकार दिला होता
तेव्हा आठवणींच्या पलीकडचा
झोका नकळत मी घेतला होता

✍🏻(कविराज अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर