*** कोरोनाची साखळी ***

Started by धनराज होवाळ, April 23, 2020, 08:07:09 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


*** साखळी कोरोनाची ***

सुखात होती सारी धरती,
चाललं होतं अगदी छान..
काळजात धस्स व्हावं,
तशी आली चायनाची घाण..!!

कसं नव्हतं असं झालं,
जग कोरोनाग्रस्त झालं..
भयानक या महामारीने,
सारं गाव गाव त्रस्त झालं..!!

लॉकडाऊन असून सुद्धा,
लोकं सैरावैरा पळू लागली..
निष्काळजी माणसे मात्र,
झुंड झुंड मरू लागली..!!

मित्रहो नका पडू घराबाहेर,
घरच्यांना ही थोडं जाणूया..
मोबाईल आता बाजूला ठेऊन,
प्रेमाचे दोन शब्द त्यांना बोलूया..!!

मास्क सॅनिटायझर वापरुन,
स्वतःला सुरक्षित आपण ठेवूया..
सोशल डिस्टंसिंग वापरुन,
देशाचा अभिमान आपण बाळगूया..!!

घ्या काळजी स्वतःची,
हस्तांदोलन आता सोडुया..
कोरोना पासून वाचण्यासाठी,
डॉक्टरांना हात आता जोडुया..!!

पोलीस आहेत डॉक्टर आहेत,
आता आहे परवा कुणाची...
लॉकडाऊन होऊन एकजुटीने,
साखळी तोडुया कोरोनाची...!!!
-
🤴🏻 धनराज होवाळ 🤴🏻
मो. ९९७०६७९९४९.
🙏🏻😷🤴🏻😷🙏🏻