बघा जमतय का

Started by शिवाजी सांगळे, April 24, 2020, 10:37:49 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बघा जमतय का

जमतय का बघा एकदा
एखाद झाड होणं...
मातीच्या खोल उरातून
धरेच्या शीरी येणं...
झेलून कैक घाव मस्तकी
ते स्थितप्रज्ञ राहणं...
सहन करीत पाऊस वारा
फुला फळांच देणं...
तापून नित्य तप्त उन्हात
वाटसरूचं छत होणं...
संपताच आयुष्य स्वतःचे
मानवासाठी जळणं...

©शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९