व्यापले घरटे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 25, 2020, 08:04:57 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.व्यापले घरटे*

व्यापले आहे घरटे
प्रेमाने तुझ्या आता
अंधार मय जीवनात
थोडा प्रकाश येता

जाऊ नकोस दूर तू
सहन होणार नाही
तुझ्याशिवाय राणी
हा जीव जाणार नाही

खूप सोसले आहे मी
दुःख जगात असतांना
तू आली आहेस आता
घाव सुके सुके होतांना

वाटलेच तुला जरा गं
मी धोका देणार आहे
बघ परीक्षा घेऊन माझी
शेवटचा श्वास घेणार आहे

आस लागलीच आहे गं
तुला एकदा पाहण्याची
घेतो सुटका मी थोडी गं
क्षणिक असावे वाहण्याची

फुल जपून ठेवले आहे
तू सांगितल्या प्रमाणे मी
काळीज गहाण होतें माझे
सांगून आणतो बहाणे मी

फक्त तुझ्यासाठी

कविराज .अमोल दशरथ शिंदे
मो.९६३७०४०९००.अहमदनगर