सामर्थ्य शब्दांचे

Started by Shilpa Mohite, April 26, 2020, 07:36:53 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

शब्दांचे सामर्थ्य किती थोर
मेणाहूनही मऊ वज्राहून कठोर
     शब्दांमुळे येती नयनी आसू
     शब्दांमुळेच येते ओठी हसू
अपशब्दामुळे होतो कलह
प्राणाहूनही प्रिय सख्यांचा विरह
     शब्द शब्दामध्ये गुंफता
     घडते एक सुंदर कविता
शब्द शब्दाने जोडता
आकारते शूरांची कथा
     शब्दात आहे सामर्थ्य मोठे
     क्षणार्धात होते खऱ्याचे खोटे
शब्दानेच टळते दृष्कृत्य
शब्दानेच होते असत्याचे सत्य
     शब्दच आहेत साहित्याचा पाया
     शब्दच घडवितात साहित्याचा कळस
शब्दानेच झाली भाषा समृद्ध
शब्दांचेच गोडवे गाती आबालवृद्ध
                 -शिल्पा मोहिते

Shubhangi Gaikwad

Your poem is very nice because of beauriful words.