जीवाला जाळायचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 27, 2020, 09:00:13 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जीवाला जाळायचं*

तू ऑनलाइन येऊन
लगेच पळायचं
असं रोज टाळायचं
आमच्या जीवाला जाळायचं

तुझं नेहमी न बोलणं
आमचं मात्र येऊन बसणं
तुझा dp पाहत पाहत
मनातल्या मनात हसणं

अस रोज चालत गं
आता मी चालून घेईल
तुझ्या प्रत्येक शब्दाला
अंतकरणातून होकार देईल

कस बस तुला पाहून
आरशात मी जगतो गं
तुझ्या सोबत चंदेरी
दुनियेत मी रमतो गं

अस रुसू नकोस तू
तू बोलत जा माझ्याशी
शप्पत देतो तुला मी
बोलणार नाही कोणाशी


✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर