सांजवेडी झाली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 27, 2020, 09:55:35 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.सांजवेडी झाली*

सांजवेडी झाली तूला सोबत जव्हा पाहिली
तुह्या वयाची गं चर्चा समद्या गावात झाली

तू रूपांन देखणी जसं अप्सरेच रूप
मी सावळा कान्हा कसा दिसाया विद्रुप
विषय गावात झाला तू सोबत कशी आली
तुह्या वयाची गं चर्चा समद्या गावात झाली

तुह्या माह्यात कसला विषय नव्हता घडला
समद्या गावात कसल्या अफवेचा पेव चढला
कोण म्हण मैत्रीण तर कोण म्हण साली
तुह्या वयाची गं चर्चा समद्या गावात झाली

तू व्हती नक्षत्राचं देणं चंद्र व्हता साक्षीला
किती दिवसांनी मी लावला व्हता वशिला
अन आता कूढं तू माह्या प्रेमात व्हती न्हाली
तुह्या वयाची गं चर्चा समद्या गावात झाली

दोस्त व्हता साथीला निरोप त्यानं पाठीला
ती येणार आहे सांच्याला नदीच्या काठीला
आज कुढं तू गं भेटायची बोलणी केली
तुह्या वयाची गं चर्चा समद्या गावात झाली

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर