अव्यक्त प्रेम

Started by Rohan Rajendra Bhosale, April 28, 2020, 11:49:36 PM

Previous topic - Next topic

Rohan Rajendra Bhosale

                  अव्यक्त प्रेम

               मला नाही माहीत ग माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही. पण, हा तुला पाहिल्या विणा मला चैनचं पडंत नाही. तु दिसली ना, तर मनाची चलबिचल होते. काय करावं आणि काय नाही, काहीच कळंत नाही. ही नजर देखील माझी सतत तुझ्या वाटेवर नजर ठेवुन राहते. कधी तू येते तर कधी येतंच नाही. कधी-कधी तुझे भासंच खुप काही सांगुन जातात. तु येण्याची मज चाहुल देवून जातात.
            खुप वेळा मी स्वत:ला प्रश्न केला, काय असावं हे नातं. पण नाही मनं कधी मानलंच नाही. नको त्या भ्रमात अडकून बसलं होतं. "प्लिज माझ्यासाठी". बस्स... तुझ्या एवढ्याश्याच वाक्याने घायाळ होतो मी अन् तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतं हे मनं... अगदी काहीही.
              दिवस भर तुझ्या आठवनींशी खेळणं, रात्र बे रात्री तुझ्या स्वप्नांत रंगणं. हे असंच चालु असतं माझ्या दिवसाचं दिनचक्र. मला माहीत आहे, तुलाही शांत झोप लागत नाही ना. मला आठवल्या विणा तुझा ही दिवस जात नाही.  जेवढा मी तुझ्यासाठी झुरतेय तितकीच तुही माझ्यासाठी झुरतेस. आत्ता तु म्हणशील, 'छे.! काहीही नको बडबडुस. तुला काय माहीत.., तु कीतीही खोटं बोल ग माझ्याशी. पण तुझ्या डोळ्यातंच दिसतं. तु न् बोलताचं तुझे डोळेचं खुप काही सांगुन जातात..
          सुर्याची किरने पडण्याआधीचं भेटायला बोलावतेस, सगळ्या गोष्टी सांगतेस. मग, फक्त प्रेम व्यक्त करायला का घाबरतेस. मी तुला म्हणतोय, पण माझी सुद्धा तीच अवस्था आहे. सगळं काही सांगतां येतं पण, प्रेम आहे तेच सांगतां येत नाही. हे असं अव्यक्त आपलं प्रेम कधी व्यक्त होईल काय माहीतं.

( हि कथा माझ्या फिल्म मधे प्रदर्शित झालेली आहे. डायलाॅग च्या स्वरुपात )
कवी - रोहन राजेंद्र भोसले.
भ्रमनध्वनी - ८१०८९१९२३४[/b]