कण कण आसवांना

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 30, 2020, 07:21:23 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.कण कण आसवांना*

किती दिवस झाले
आभाळ रडून थकले
मनाला कळलं नाही
कोण होतें कुठे चुकले

कण कण आसवांना
किती समजावले होते
तुझ्या प्रत्येक भेटीला
आनंदाने कवटाळले होते

बहाल करणार होतो
तुझ्या असण्याचे श्वास
असे हक्क कुणाला
दिले नव्हते मी खास

घोट घोट हा जिंदगीचा
संपून चालला होता
अंदाज का या आरशाने
तू असण्याचा बंधला होता

काडी काडी गोळा होऊन
स्वप्नांचा महाल सजला होता
विरहाच्या दुनियेत येणारा
प्रत्येक शब्द येथे झिजला होता

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

mazisanskruti

khup chan kavita ahe sir tumchi
tumchi harkat nasel tr tumchya kaviteche sadarikaran youtube vr karu shkte ka