काळजान आत्महत्या केली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 02, 2020, 08:28:02 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.काळजान आत्महत्या केली*

काळजात घर करणारी ती
घर सोडून गेली
खूप शोधलं तिला
ती भेटलीच नाही
डोळ्यातून येणाऱ्या आसवांनी
विचारपूस सुरू केली
दुःख कवेत घेणाऱ्या धरणीला
समुद्राचे वेगवेगळे किनारे
तिथे ही गेलो खुणा तशाच होत्या
वाळूवर घर करून बसल्या होत्या
एकत्र गुजगोष्टी केलेल्या जागेवर
तिची ओळख सांगून विचारपूस केली
त्यांन ही कणाडोळा केला
खोट्या प्रेमाचा सारा किस्सा उलगडला

सांग ना रे मग.....
कोण कुठे होता चुकलेला.....

थकून थकून सांज झाली
कट्टयावर बसून एक एक
आसवांना दोष दिला तर
त्यांना चांगलाच हिसका आला
आम्हाला वाया घालणारा तू बघ जरा
ज्याला जीव लावला तो दगा देऊन गेला
अंधुक दिसणाऱ्या सूर्याला विचारलं
तू खरंच होतास ना रे सोबतीला

सांग ना रे मग ......
कोण कुठं होतं चुकलेला....

हळू हळू चंद्र चांदण्यांची
मैफिल सुरू झाली
एक चांदणी चंद्राजवळ आली
म्हणाली हाच तो वेडा
ज्यांन प्रेमाची सीमा पार केली
रात किडे,काजव्यांनी
एकच कालवा सूरु केला
जो तुझा नव्हताच कधी
तो तुला सोडून गेला

सांग ना रे मग.....
कोण कुठे होता चुकलेला....

डोळे मिटण्याची
घाई सुरू झाली
अचानक काळजाची
धड धड थांबली
श्वासांनी हंबरडा फोडला
गावात चर्चा सुरू झाली
प्रत्येकाने वेगवेगळा अंदाज बांधला
पोरगं नाहक मेलं करमान गेलं
शरीरानं साथ सोडली
आठवणींनी सांत्वन केलं
स्वप्नांनी पांघरून घातलं
आत्मा शोधू लागला आडोसा
घेऊ लागला कानोसा
नेमकं कोण मेलं अन नेमकं कोण गेलं

एकदाच माहीत झालं....
साऱ्या प्रश्नाचं कोड सुटलं...
कळलं तिला जीव लावणाऱ्या....

काळजानं आत्महत्या केली ......

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर