आई

Started by Dnyaneshwar Musale, May 02, 2020, 10:57:18 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आई म्हणजे नितळ
पाण्याचा झरा
आई म्हणजे शांत वारा,
आई म्हणजे भाकर
आई म्हणजे साखर.

आई म्हणजे
पहाटेची काकडा आरती,
आई म्हणजे 
विठ्ठल रखुमाईची  मूर्ती.

आई म्हणजे मायेचा हात
आई म्हणजे गोड गुळाचा भात,
आई म्हणजे तुरीची झाप
आई म्हणजे पाठीवरती थाप.

आई म्हणजे घागर
आई म्हणजे मायेचा पाझर,
आई म्हणजे हिरवगार रानमाळ
आई म्हणजे आभाळ.


आई म्हणजे राऊळाचा कळस
आई म्हणजे वृंदावणातली तुळस,
आई म्हणजे शाळा
आई म्हणजे लळा.

आई म्हणजे ऋतु
आई म्हणजे आयुष्याचा सेतु,
आई म्हणजे साऱ्या चुकांना माप 
आई म्हणजे कधी आई तर कधी बाप.