मुक्तहास्य

Started by sachinikam, May 03, 2020, 08:58:17 PM

Previous topic - Next topic

sachinikam

मुक्तहास्य (कवी: सचिन निकम, मुकुटपीस)

बेंबीच्या देठापासून काळजाच्या काठापर्यंत
हृदयाच्या गाभाऱ्यातून मनाच्या लाटांपर्यंत
स्मित का होईना हसू उमटुदे मुखावर
पुरे झाले आता रूसने सुखांवर

जे काही साठलय मनात मोकळ कर थेट
नाही पटल तर मौन, पटल तर गळेभेट

येन केन प्रकारेन व्यक्त करशील स्वतःला
नाहीतर आत घुसमटून मारशील स्वतःला

इतरांच्या भावनांना देशील प्राधान्य
कलागुणांनाही दाद देशील अनन्य

संकटांचा करशील हसून सामना
आपोआपच पुऱ्या होतील मनोकामना

गंभीर परिस्थितीला हसण्यावर नको घेऊ
जन्ममरणाचा प्रश्न टोकालाही नको नेऊ

इतके सोपे आहे जीवनाचे रहस्य
भवताली दरवळूदे प्रसन्न "मुक्तहास्य".

Visit YouTube Channel "Skrinz Studios"