खेळ पुन्हा पुन्हा

Started by marathi, February 15, 2009, 07:39:07 PM

Previous topic - Next topic

marathi

=================================
खेळ पुन्हा पुन्हा आपण तोच तोच खेळत होतो
तू डाव मोडत होतीस आणि मी तो मांडत होतो
तुझे जगच वेगले जुळवून मी घेत होतो
तुझे वागनेच वेगले हसून मी टाळत होतो
हात तुझाच हाती पुन्हा पुन्हा घेत होतो
सोडवून सोडवून तू पण थकशील मनाला बजावत होतो
खेळ पुन्हा पुन्हा आपण तोच तोच खेळत होतो
कधी कधी तुला माझी व्हावेसे वाटायचे
खरच आयुष तेव्हा मला जगावेसे वाटायचे
तुझे ते मिठितिल मिटने रोमांचित करूँ जात होते
खेळ पुन्हा पुन्हा आपण तोच तोच खेळत होतो
वाट ते तुला नेहमीच तू जिकतेस
तर ते खरे होते
कारन आपले खेळच वेगले फक्त एकत्र खेळत होतो
तू बुधिबलात तर मी भातुकलित रमत होतो
खेळ पुन्हा पुन्हा आपण तोच तोच खेळत होतो
=======================================
सुगंध
========================================

please post your comments.

santoshi.world

सुरुवातीचे खूपच छान!!  :) ...... पण शेवट जरा आवडला नाही. .......... मुली भातुकलीत रमतात आणि मुले बुद्धिबळात.  :P

sanjay_123

अप्रतिम.........
ख़रच खुपच छान आहे ............................

mohan3968


gaurig