जिंदगी उधार झाली

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 04, 2020, 07:29:09 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जिंदगी उधार झाली*

जिंदगी उधार झाली
सारी हयात गेल्यावर
गाव कोणता माझा
जवळ आला मेल्यावर

दुःख मी पेरीत होतो
काळजाच्या रानावर
सरकार जागे झाले रे
जेव्हा लटकलो फासावर

लाख मोलाचा स्वभाव हा
पुरला नाही या सरणावर
गाव कुसावर वस्ती माझी
प्रेम केले मग मी मरणावर

घोट घोट जिंदगीला या
गहाण ठेवले कर्जावर
पै पै फेडण्यात गेली
कमी ना आली व्याजावर

आसवांनी घर केले होते
सारा दोष गेला नशिबावर
कोण होते पांढरे बगळे
आता विश्वास ठेवू कोणावर

✍🏻(अमोल दशरथ शिंदे)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर